Sunday, November 26, 2023

Latest Posts

‘ या ‘ कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल ५० हजारांचा बोनस जाहीर

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे (Diwali Bonus) वेध लागले आहेत.

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे (Diwali Bonus) वेध लागले आहेत. काही महापालिका, आस्थापनांनी दिवाळी बोनस जाहीर केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कर्मचाऱ्यांना यंदा अधिक बोनस जाहीर करण्यात आला आहे. सिडकोच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक उत्साहासाने साजरी होणार आहे. सिडको प्रशासनाने (CIDCO Bonus) आपल्या कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.

सिडकोने सगळ्या महामंडळापेक्षा, इतर शासकीय कार्यालयांपेक्षा सर्वाधिक बोनस आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बोनसची घोषणा होताच कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. सिडकोच्या या निर्णयाचे सिडको कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे. सिडको प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्व सिडको कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी शुभ ठरली आहे. कर्मचाऱ्यांना घोषित बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना वितरित केली जाईल असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी युनियनच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

 

ठाणे महानगरपालिकेकडून 21,500 हजार रुपयांचा बोनस
ठाणे महानगरपालिकेकडून (Thane Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये (Diwali Bonus) भरघोस 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 18 हजार रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये 20 टक्के वाढ झाली असून 21 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच आशा सेविकांना यंदा 6000 रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे. भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात भरघोस 20 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी वर्गाची दिवाळी गोड झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.

कल्याण डोंबिवली मनपाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून (Kalyan Dombivali Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 16 हजार 500 रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये वाढ झाली असून 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

शशिकला भगवान मस्के या बीआरएसच्या सरपंचपदाच्या उमेदवार

तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss