Tuesday, November 28, 2023

Latest Posts

कल्याणच्या जिल्हाप्रमुखानेच एकनाथ शिंदेंविरुद्ध शड्डू ठोकला

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र समोर आले आहे अनेक गावांमध्ये राजकीय पुढार्‍यांना गावांमध्ये प्रवेश बंदी केली असून गावोगावी शहरांमध्ये मराठा समाज एकवटला आहे. अनेक ठिकाणी साखळी उपोषण तर लाक्षणिक उपोषण मराठा समाजाकडून सुरू आहे. या मोर्चामध्ये राज्य शासनाला मराठा समाज जबाबदार धरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटातही पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील पदाधिकाऱ्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण आंदोलकांना पोलिसांकडून देण्यात येत असलेल्या नोटिसांवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठिंबा दिला जात आहे. कल्याणमध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज कल्याण तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या साखळी उपोषणात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे.

अजित पवार यांना बारामतीमध्ये येण्यास बंदी, आल्यास आंदोलन करु; मराठा मोर्चाचा इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतच येण्यास बंदी करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, आलात तर आंदोलन करु, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला येवू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासन पोलीस प्रशासन आणि सकल मराठा समाजाची संयुक्त बैठक कारखान्याच्या शिवतीर्थ कार्यालयात झाली. ती बैठक निष्फळ ठरली.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss