Wednesday, April 24, 2024

Latest Posts

महाराष्ट्रातील २९ वी महानगरपालिका जालना

जालना (Jalna) नगरपालिकेचे रूपांतरण आता महानगरपालिकेमध्ये (Municipal Corporations) होणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.

जालना (Jalna) नगरपालिकेचे रूपांतरण आता महानगरपालिकेमध्ये (Municipal Corporations) होणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जालना हे आता राज्यामधील २९ वी महानगरपालिका घोषित करण्यात आली असून सरकारने आदेश काढले आहेत. या संदर्भामध्ये नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केल्या आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रूपांतरण महानगरपालिकेत करण्यासाठी अनेक राजकीय हालचाली सुरु होत्या. याबाबतीत जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यामुळे तेव्हा हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता.

याबाबतीत सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यांनतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महानगरपालिकेमध्ये करण्यात आदेश काढण्यात आले आहेत. जालना महानगरपालिकेची घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. जालना शहराला स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर जालनाला मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील राज्यभरामध्ये ओळख आहे. जालनाची लोकसंख्या वाढत चालली आणि शहराच्या दृष्टीने जालना महानगपालिका घोषित करण्यात यावी यासाठी अनेक वर्ष मागणी केली जात होती. आता या पाठपुराव्याला यश मिळत आहे.

मराठवाड्यामध्ये जालना जिल्याची एक वेगळीच ओळख आहे. जालना जिल्यामधून स्टील इंडस्ट्रीमुळे बांधकामासाठी लागणारे स्टील देशभरामध्ये पोहोचवले जाते. यामुळे जालना शहरामध्ये मोठी औद्योगिक उलाढाल पाहायला मिळते. सोबतच कृषीच्या दृष्टीने देखील या जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. या शहरामध्ये मोसंबीचे मोठे उत्पादक होत असून या मोसंबीची विक्री दिल्लीपर्यंत होते. राजकीयदृष्ट्या देखील जालना नेहमी चर्चेत असतो. हा जिल्हा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss