Monday, November 13, 2023

Latest Posts

पहिल्याचं सभेत जरांगेंचा इशारा कुणाला?

मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना आज डिस्चार्ज मिळाला आ

मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.

दरम्यान, रुग्णालयातून सुट्टी होताच जरांगे पुन्हा एकदा आंतरवाली सराटीकडे (Antarwali Sarathi) रवाना झाले. मात्र, याचवेळी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तर, डिस्चार्ज मिळाल्यावर आपल्या पहिल्याच सभेत त्यांनी जालना (Jalna) येथील एका राजकीय नेत्यावर हल्लाबोल केला आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात एका राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी गावबंदीचे पोस्टर फाडून, मराठा तरुणांना मारहाण केल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे या नेत्याला आता थेट पंढरपूरचाच झेंडा उचलायला लावणार, असल्याचा खोचक टोला जरांगे यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “आपल्या लेकरांच्या भविष्याचे बोर्ड आता फाडण्यात येत आहे. पण, त्याला माहितचं नाही मराठे किती एडपट आहे. आता जर पोस्टर फाडले तर आम्ही तुमचे कपडे फाडणार. तुला सुट्टी नाही आता भाऊ, यानंतर तू बोर्ड फाडू नको. मग तो भोकरदनचा कोणी का असू नयेत. भोकरदनच्या आपल्या एका भावाला मारहाण झाली. आम्ही जर एकदा मागे लागलो तर मग तो मंत्री असो, आमदार असो, माजी आमदार असो किंवा तो कोणत्याही पक्षाचा असो. आमच्या लेकराच्या भविष्याचा पोस्टर फाडल्यास राज्यात एकही मराठ्याने त्याचा कार्यकर्ता राहायचा नाही, असे जरांगे म्हणाले.

 

पंढरपूरचा झेंडा उचलण्याशिवाय दुसरं कामच ठेवणार नाही
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, “आम्ही मतदान मागत नाही. आम्ही आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यासाठी आरक्षण मागत आहोत. ते देण्यासाठी तुम्ही जर बॅनर फाडणार असाल, तर तुमच्यापेक्षा जास्त हाणामारी आम्हाला कळते. आम्ही बांधावरून दोन दोन दिवस रेटा-रेटी करतो. तू तर आमचं बॅनर फाडलं आहे. तुझं कार्यक्रमचं झालं समज, दिसेल तिथं तुझ्या गाडीचं टायर देखील काढून नेतील. आणखी तरी सांभाळून राहा. तुझं नाव जर समोर आलं, तर तुला बुक्का लावला समज. तुला थेट पंढरपूरचा झेंडा उचलण्याशिवाय दुसरं कामच ठेवणार नाही, असे जरांगे म्हणाले.

संध्याकाळपर्यंत त्या नेत्याचं नाव घेणार
आम्ही आमच्या आयुष्यासाठी आरक्षण मागत आहोत. जर याला तुम्ही विरोध करत असाल, तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला आमचे लेकरं मोठे होऊ द्यायचे नाही. मग तुम्हाला आम्ही देखील मोठे होऊ देणार नाही. तुझ्या अंगावर मराठे आयुष्यभर गुलाल पडू देणार नाही. आपल्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. भोकरदनमध्ये मराठा समाजाच्या तरुणांना कुणाच्या कार्यकर्त्यांनी मारलं, कोणी बॅनर फाडायला लावले त्याचं नावं पुढे येऊ द्या फक्त, तो वाळीतच पडला समजा. मी संध्याकाळपर्यंत त्या नेत्याचं नाव घेणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.

Latest Posts

Don't Miss