गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एक कण देखील खाल्ला नाही, त्यामुळे अंतरवली सराटी गावामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे. तसेच, प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे यांनी पाणी प्यावं अशी विनंती मराठा आंदोलक करत आहेत, त्यामुळे आता अंतरवली सराटी गावामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यासोबतच घोषणा देखील होत आहेत. पाणी घ्या, पाणी घ्या…. जरांगे साहेब पाणी घ्या… अशी घोषणाबाजी या आंदोलकांकडून होत आहे. आमरण उपोषणामुळे त्यांनी अन्न- पाण्याचा एक कण देखील घेतला नाही, तसेच पाणी पिणं देखील पूर्णपणे बंद आहे, यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे, त्यांचं हे उपोषण सध्या दुसऱ्या टप्प्यात चालू आहे. मात्र मागील काही दिवसात त्यांनी ऍन पाण्याचा पूर्णपणे त्याग केला आहे. असे असले तर मागणीवरून त्यांनी पाण्याचे दोन- तीन वेळा घोट घेतले. पण, आता त्यांनी पाणी पिण्यास देखील नकार दिला आहे, यासोबतच प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचार घेण्यास सांगितलं तेव्हा देखील त्यांनी तो उपचार घेण्यास नकार दिला.
राज्य सरकारकडून मनोज जरांगेच्या शिष्टमंडळाला उद्या निमंत्रण
मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाने आमच्याशी मुंबईत येऊन चर्चा करावी याचे निमंत्रण दिले आहे, मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला बसण्याआधी देखील त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यसरकार सोबत चर्चा केली होती त्यानंतर राज्यसरकार ने त्यांना उपोषण न करण्याची विनंती केली होती. आमदार हे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या घरावर दगडफेक होणं जाळपोळ होणं हे योग्य नाही, हे आंदोलन आता भरकटते आहे. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे मराठा आरक्षण भरकटलं होतं, ते होऊ नयेत. तर, कायद्यात आणि सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले
प्रसिद्ध अभिनेत्रीकडून मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याच्यावर गंभीर आरोप