Monday, November 13, 2023

Latest Posts

मनसेच्या दिपोत्सवात जावेद अख्तरांचं बेधडक वक्तव्य

मनसेच्या दीपोत्सवात सेलिब्रिटी लावणार हजेरी 'दीपोत्सव 2023'चा दुसरा दिवसही खास असणार आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी दीपोत्सवाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी

मी अशा देशात जन्मलो आहे की, ज्या देशात राम आणि सीता यांचा जन्म झाला आहे. श्रीराम आणि सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाहीत, तर देशातील सर्व नागरिकांचे दैवत असल्याचे मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Lyricist Javed Akhtar) यांनी व्यक्त केलं. काही गोष्टी जरा खुल्या पद्धतीनं बोलल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन पटकथा लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी जावेद अख्तर बोलत होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. मनसेच्या दीपोत्सवाचे यंदाचे हे 11 वर्ष आहे.

सलीम खान (Salim Khan) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) या जोडीने आजवर अनेक कलाकृतींसाठी पटकथा लिहिल्या आहेत. बॉलिवूडमधील ही लोकप्रिय पटकथालेखन करणारी जोडी आहे. सलीम-जावेद यांनी 1970 मध्ये भारतीय सिनेसृष्टीत क्रांती घडवून आणली आहे. बॉलिवूडपट ब्लॉकबस्टर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सलीम-जावेद यांच्या लिखानाचा भारतीयांवर प्रभाव पडतो. 1970 मध्ये त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा विविध विषयांवर भाष्य केलं. डॉन, सीता-गीता, मजबूर, क्रान्ती, त्रिशूल, शोले, मिस्टर इंडिया, शक्ति, जंजीर, शान, काला पत्थर, हाथी मेरे साथी, यादों की बारात, दीवार अशा अनेक सिनेमाचं लेखन सलीम-जावेद या जोडीने केलं आहे

मनसेच्या दीपोत्सवात सेलिब्रिटी लावणार हजेरी
‘दीपोत्सव 2023’चा दुसरा दिवसही खास असणार आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी दीपोत्सवाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani), लेखक अभिजात जोशी (Abhijat Joshi), निर्माते साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala), दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या हस्ते 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता उद्धाटन होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कवर मनसेच्या वतीने दीपोत्साचं आयोजन केलं आहे. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या 11 वर्षांपासून जणू समीकरणच बनलं आहे. शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करण्यात येत असते. मनसेच्या दीपोत्सवात मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारदेखील हजेरी लावत असतात. हा दीपोत्सव तुळसी विवाहापर्यंत सुरू असतो. मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दीपोत्सवाला हजेरी लावतात.

हे ही वाचा : 

दिवाळीकरा पण फटाक्यांन शिवाय पालकमंत्री केसरकर यांचे आवाहन

दोन उपमुख्यमंत्री पण विठुरायाची महापूजा कोण करणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss