spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

संतोष देशमुख हत्याप्रकरणी SIT वर जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले सवाल…

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्याप्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. हत्याप्रकरणी आता पर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी पोलीस कोठडीत आहे आणि त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यालाही अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणी सरकारने SIT चौकशी नेमली आहे. त्यावरुन शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

 

जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी बीड हत्या प्रकरणाच्या तपासावरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकं ट्विट मध्ये काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.

संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडनुक काळात धंनंजय मुंडेचा कार्यकर्ता आसल्या प्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा आत्यंत खास माणुस असुन गेले १० वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

आरोपींचे नावे काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणे आणि डॉ. संभाजी वायभसे यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.

हे ही वाचा:

Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…

Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss