spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

वाल्मिक कराड शरण आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण राज्यात चांगलेच गाजले आहे. या प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा संतोष देशमुखच्या हत्यानंतर फरार होता. त्यातच आता बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. २३ दिवसांनी शरण आल्याने आता तो २३ दिवस कुठे होता असा प्रश्न उपस्थित होता आहे. आता याप्रकरणी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार घणाघात केला आहे. आतापर्यंत वाल्मिक कराड हजर का झाला नाही, आज का हजर झाला, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

वाल्मिक कराड पोलिसांच्या स्वाधीन झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित करून आरोप केले आहे. वाल्मिक कराडला अजून ३०२चा आरोपी कुठे केलंय, खंडणीच्या गुन्ह्यात घेतलं. खंडणीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन महिने. जामीन तर होणारच, ही प्लॅन स्ट्रॅटेजी होती, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
आजपर्यंत का हजर झाले नाही. आज का हजर झाले. यांची चूक सापडली यांच्या अजून किती चूका सापडायच्या. बापू आंधळेच्या केसमध्ये पोलिसांनी याला का नाही अरेस्ट केलं. ३०७ चा आरोपी आहे तो. बाकीचे आरोपींना अरेस्ट केलं. याला का नाही केला. ज्या केज पोलीस ठाण्यात सरेंडर होतोय, त्या केजमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत. ते आंधळेच्या मर्डर केसचे तपास अधिकारी आहे. केजचे जे आता अधिकारी आहेत, त्यांनीच वाल्मिकला मदत केली आहे. ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून याला ३०७ चा आरोपी करून गितेला ३०२चा आरोपी करून याला मोकळा सोडला. कालपरवा पर्यंत हा परळीच्या पोलीस ठाण्यात जाऊन बसायचा. पोलिसांसोबत पार्ट्या झाल्या याच्या. हजारवेळा महाजनबरोबर पार्ट्या झाल्या, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ही प्लॅन स्ट्रॅटेजी होती
पुढे ते बोलले, ही प्लॅन स्ट्रॅटेजी होती. त्यानुसार चालू होतं. तो पुण्यात हजर होतो, त्या अर्थी तो पुण्याच्या आसपास आहे. त्याच्याबरोबर कोण आहेत हे कळत नव्हतं. नवीन नवीन गॅझेट आलंय याला शोधता आलं नाही. लोकांच्या मनात संशय आहे. माझ्या मनात संशय आहे. याला अजून ३०२चा आरोपी कुठे केलंय. खंडणीच्या गुन्ह्यात घेतलं. खंडणीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन महिने. जामीन तर होणारच. परळी शहरातील पोलीस स्टेशनमध्ये बापू आंधळे नावाची मर्डर केस आहे. त्या हा आरोपी आहे. मग एवढे दिवस, असेही जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.

तो गुन्हेगार आहे हे सांगण्याची पोलिसांची हिंमत झाली नाही
परळीत एका घरावर हल्ला झाला. आंधळे मेला. त्याला मारायचा नव्हता. पण तो मेला. महाजन नावाचा अधिकारी होता. त्याने वाल्मिक कराड नाव न लिहिता वाल्मिक अण्णा लिहिलंय. त्यानंतर वाल्मिक १०० वेळा पोलीस ठाण्यात गेला. पण तो गुन्हेगार आहे हे सांगण्याची पोलिसांची हिंमत झाली नाही. दुर्देवाने आता महाजनच या प्रकरणात गेला. ही जातीपातीची लढाई नाही. हे आर्थिक प्रकरण आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss