spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

ज्योती जाधव वाल्मिक कराडची दुसरी पत्नी; दुसऱ्या पत्नीच्या नावाने देखील फ्लॅट्स

संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्य आणि राजकीय वातावरण हादरला आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड बाबत नवीन माहिती समोर आली आहे. ज्योती मंगल जाधव ही महिला वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी आहे. तिच्या नावाने पुण्यात आणखी तीन फ्लॅट्स असल्याची माहिती मिळाली आहे. ज्योती मंगल जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं देखील असून त्यांच्या नावे देखील काही संपत्ती खरेदी केल्याचं समोर आली आहे.

 

ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत कोट्यावधी रुपये खर्च करुन दोन ऑफीस स्पेसेस खरेदी करण्यात आल्याचेही समोर आलं आहे.पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये सेक्टर आर 21, टॉवर 33, 17 वा मजल्यावर 7 नंबरचा एक फ्लॅट, तर आर 21, टॉवर 33, 8 नंबरचा दुसरा फ्लॅट आणि Gera Greensville, फ्लॅट नंबर A 3 , खराडी हा आणखी एक फ्लॅट ज्योती मंगल जाधवच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोर वाल्मिक कराडच्या स्वतःच्या आणि पहिल्या पत्नीच्या नावे पिंपरी-चिंचवडमध्ये दोन फ्लॅट असल्याचे देखील उघड झालंय. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड सुरवातीच्या दिवसात ज्योती जाधवकडे राहायला होता अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ज्योती जाधव यांची चौकशी देखील करण्यात आलीआहे.

कोट्यवधींची रक्कम कुठून आणली?

वाल्मिक कराडचे पिंपरी चिंचवडमध्ये दोन अलिशान फ्लॅट असल्याची अन त्या फ्लॅटचा कर थकवल्याचं समोर आलं. त्यानंतर जागी झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने वाल्मिक कराडच्या एका फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यांनंतर काही तासांतच कराड कुटुंबीयांनी दोन्ही फ्लॅटचा थकीत कर भरुन टाकला. पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचा ही कर अदा करण्यात आला नव्हता. या फ्लॅटचा 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा कर थकलेला होता. जो आता भरण्यात आलाय. तर एप्रिल 2016मध्ये पिंक सिटी रोडवरील मि कासा बिला सोसायटीतील टू बीएचके खरेदी करण्यात आला होता. आता मिळकत कर तर भरला गेलाय मात्र प्रश्न या मिळकती खरेदी करण्यासाठी वाल्मिक कराडने कोट्यवधींची रक्कम कुठून आणली? याचा तपास होण्याची गरज आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss