धुळे महापालिका प्रशासनाकडून थंडावलेली फलकबाजी विरुद्धची कारवाई काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा ती थंडावल्याची बघायला मिळत आहे. धुळे शहरात पुन्हा धुळे मनपाच्या आदेशाला केराची टोपी दाखवत अनधिकृत बॅनर्स धुळे शहरात पुन्हा एकदा झळकू लागले आहे.
काही दिवसांपूर्वी धुळे महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर्सवर बंदी घालत परवानगी घेतलेल्या बॅनर्सला क्यूआर कोड लावणी अनिवार्य केले होते. आणि धुळे शहरातील अनेक भागात अनधिकृत बॅनर्सला बंदी करण्यात आली होती. मात्र धुळे मनपाचे सर्व आदेश जुगार पुन्हा एकदा धुळे शहरात अनधिकृत बॅनर झळकू लागले आहे.
याप्रकरणी धुळे मनपाचे उपायुक्त अतुल निकम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आता काही दिवसांवरच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आलेली असतानाच धुळे शहरात आतापासूनच मोठ्या प्रमाणात बॅनर लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करावा हे प्रत्येकालाच वाटते परंतु धुळे महानगरपालिकेने जे आदेश दिले आहे त्याची देखील पालन करावे व ज्या ठिकाणी परवानगी नसेल व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी बॅनर लावू नये व धुळे महानगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊनच बॅनर लावावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच बॅनर्स छापणाऱ्यांनी देखील बॅनरची रितसर परवानगी घेतलेली आहे की, नाही हे देखील तपासून पाहावे असे आवाहन उपायुक्त अतुल निकम यांनी यावेळी केले आहे.
हे ही वाचा:
Bank Update : RBI ची मोठी कारवाई; ‘या’ बँकेवर येणार बंदी पैसे काढण्यास देखील मनाई
गाव सोडून शहराकडे वळणाऱ्या सगळ्यांसाठी ‘गाव बोलावतो’, टिजर रिलीज