spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

खोक्या भाई उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक; पोलिसांनी दिली माहिती

आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्याने मारहाण करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर त्याचे अनेक मारहाणीचे व्हिडीओ वायरल झाले. आता बीड पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई अटक केली आहे. काही दिवसांपासून तो फरार होता. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही माहिती दिली.

खोक्या भाई फरार असताना प्रसार माध्यमांना त्यांनी मुलाखती देत होता. त्याच्या या मुलाखतींमुळे पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होता. खोक्यानं बॅटनं एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ करुन समाजमाध्यमात दहशत निर्माण करण्यासाठी व्हायरल केला होता. आता पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सतीश भोसले याला अटक झालेली आहे. प्रयागराज पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केली आहे. पोलिसांनी दोन पथकं नेमून देखील त्याला अटक करण्यात आली नव्हती. खोक्या भोसलेला अटक झाली आहे. सध्या तो प्रयागराज पोलिसांच्या ताब्यात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आज यश आलं आहे. त्याला उद्यापर्यंत बीडमध्ये आणलं जाऊ शकतं.

खोक्या ऊर्फ सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ढाकणे पितापुत्राला मारहाण केली होती, त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गांजा घरी सापडल्यानंतर त्याचा देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खोक्या गेल्या दोन आठवड्यांपासून बीडमध्ये फिरत होता पण पोलिसांना तो सापडला नव्हता. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रयागराज पोलीस खोक्या ऊर्फ सतीश भोसले याला बीड पोलिसांच्या स्वाधीन करतील. आमदार सुरेश धस यांनी खोक्या ऊर्फ सतीश भोसले हा केवळ रिल्स करत असल्याचं म्हटलं होतं. खोक्यानं ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्याचं प्रकरण समोर आलं होतं. खोक्या फरार असल्यानं सुरेश धस यांची देखील अडचण निर्माण झाली होती. आता खोक्याला अटक केल्यानंतर धस यांची ती अडचण दूर झालीय असं म्हणता येईल. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था पाहायला मिळतेय. बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले होते.

हे ही वाचा : 

Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने सामने येताच; कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…

Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss