आज राज्यभरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती बापाच्या आगमनामुळे सगळीकडे एक वेगळाच उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक मंडळां सह प्रत्येक घरात बाप्पा विराजमान झाले आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाची अनेक मंदिर आहेत. प्रत्येक मंदिरांची काय तरी वेगळी खासियत आहे. धुळे (dhule) शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती (Khuni Ganpati) हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. या गणपती बाप्पाच्या नावामागे खूप मोठा इतिहास दडला आहे. गणपतीच्या नावामागे रंजक इतिहास असून हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून धुळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
गणपती बापाच्या आगमनामुळे सगळीकडे आनंद पसरला आहे. धुळे शहरात सार्वजनिक गणपतींचे आगमन केले जाते. धुळे शहरातील इंग्रज काळातील ऐतिहासिक व मानाचा मानला जाणारा खुनी गणपतीच्या (Dhule Khuni Ganesh) पालखीचे आज अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंगच्या गजरात आगमन झाले. खुनी गणपती बाप्पाला हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे खुनी गणपतीच्या आगमन होत असताना गुलालाची उधळण करण्यात येत नाही. त्यानुसार आज अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंग वाजवत खुणी गणपती बाप्पाचे आगमन झाले. धुळ्याच्या मध्यवर्ती भागात या गणपतीची स्थापना करण्यात आली. शहरातील सर्व बांधव एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करतात. या गणपतीची तयारी एक महिना अधिपासूनच केली जाते. गणेश चतुर्थी निमित्त गणपतीच्या आगमनाची तयारी जोरदार चालू आहे. असं म्हणतात जाते की, खुणी गणपतीची स्थापना १८६५ साली झाल्याचे मानले जाते. त्यानंतर १८९५ साली म्हणजेच इंग्रज राजवट लागू झाल्यानंतर येथील खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. तो सातत्याने आजपर्यंत सुरू आहे, त्याला विशेष आणि वेगळी परंपरा आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाला आजपासून मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आहे.समाजातील विविध घटकांकडून बाप्पाचे जोरदार आगमन केले जाते. धुळे शहरातील तृतीयपंथी बांधवांनी वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना केली.दहा दिवसाच्या गणपती उत्सवाची सुरुवात आजपासून झाली आहे. धुळे शहरात तृतीयपंथी बांधवांनी गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढली आहे.
हे ही वाचा:
लालबागच्या राजाचा मंडप सजला , दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
पुण्यातील गणेश उत्सवात ड्रोन कॅमेऱ्याची नजर