१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमत्तानी पुण्यातील कोथरुद्ध परिसरात भेलेकरनगर येथे रॅली काढण्यात आली होती. यावेळी गज्या मारणेच्या टोळीतील काही सराईत गुन्हेगारांनी देवेंद्र जोग या तरुणाला बेदम मारहाण केली होती. देवेंद्र जोग हा भाजपचा कार्यकारत आहे. पोलिसांनी गजानन मारणे याच्यासह रूपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी गजा मारणेला अटक केली आहे. त्याच्यावर पोलिसांनी चौथ्यांदा मकोका अंतर्गत अटक केली आहे. तर रूपेश मारणे आणि बाब्या पवार अद्याप फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
पुणे शहरातील कोथरूड परिसरात 19 फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार ते पावणे पाच वाजण्याच्या सुमारास भेलकेनगर चौकात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाचे सीसीटीव्ही पोलिसांकडे आले असून मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण होत असताना गजा मारणे हा काही अंतरावर उभा होता आणि तो त्याच्या सहकाऱ्यांना तो याला मार माज आलाय अशा सूचना देखील देत होता, अशी माहिती देखील पोलिसांनी कोर्टात दिली आहे.
याला माज आलाय याला मारा, गजाच्या मारहाण करणाऱ्यांना सूचना?
गजा मारणेला काल (25 तारखेला) कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र जोगला ज्यावेळी मारहाण झाली, त्यावेळी या फुटेजमध्ये मारहाण होत असताना गजा मारणे हा काही अंतरावरच उभा होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली. त्याचबरोबर याला माज आलाय, याला मारा अशा सूचना देखील गजा मारणे देत होता अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यासंदर्भात पुरावे देण्यात आले आहे. अशी माहिती आहे. कोर्टात युक्तीवाद झाल्यानंतर 3 मार्चपर्यंत गजानन मारणेला पोलीस कोठडी कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे.
गजा मारणेच्या वकीलांनी कोर्टात केली पोलिसांची तक्रार
गजा मारणेचे वकील म्हणाले, ज्यावेळी जोगला मारहाण झाली त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.सिनेमा बघितल्यानंतर जी काही भांडण झाली आहेत. त्यामध्ये दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते. हा कट नसून निव्वळ एक अपघात आहे.
माझ्या क्लाइंटला खाली मांडी घालून बसवलं आणि फोटो व्हायरल केला. हा अत्यंत बालिशपणा आहे. फरार आरोपी हजर होतं नाही म्हणून यांना पकडण्यात आलं आहे. पोलिसांनी प्रेशरमध्ये येऊन काम केलं आहे. या प्रकरणात 307 कलम कसं काय लागू होऊ शकतं? काल पर्यंतच्या रिमांड कॉपीमध्ये असा उल्लेख केला आहे की, ए त्या माणसाला मारा असं कुठेही नाहीये. नाकावर फ्रॅक्चर असल्यावर 307 कलम कसं लागू होऊ शकतं. या वातावरणात माझ्या क्लाइंटला कसं अडकवण्यात येईल याचा प्रयत्न केला आहे, गजा मारणेचा भाचा आला नाही म्हणून गजा मारणेला यामध्ये गुंतवण्यात आले आहे. दबावाखाली काम सुरू आहे. सध्या जे पेपर बनवले जात आहेत, ते पूर्णपणे बनावट आहेत. गजा मारणेला पोलीस स्टेशनला नेऊन खाली फरशीवर नेऊन बसवलं आणि फोटो व्हायरल केला हे मानवाधिकाराच हनन आहे,असा युक्तीवाद मारणेच्या वकिलांनी केला आहे.
मी रिट पेटिशन देखील दाखल करणार आहे. तोंडावर काळा कपडा बांधून नेण्यात येतं, खाली बसवून फोटो व्हायरल करण्यात येतो. पोलिसांकडे कुठलाही पुरावा नाही. गजा मारणे हा शुगर पेशंट आहे. पोलिसांनी फोटो व्हायरल केला, चेहऱ्याला न झाकता फोटो व्हायरल करण्यात आला आहे, अशी तक्रार गजा मारणेच्या वकिलाची कोर्टाकडे केली आहे.
जोरदार युक्तिवाद
तर सहाय्यक पोलीस आयुक्तत गुन्हे शाखा गणेश इंगळे यांनी माहिती देताना सांगितलं आरोपी विरोधात 28 गुन्हे दाखल आहे. त्याची पुणे शहरात दहशत आहे. सखोल तपास करण्यासाठी कस्टडी असणं अत्यंत महत्वाची आहे. सीसीटीव्ही CCTV फुटेज आहे, त्याचाही सखोल तपास करायचा आहे, त्यावरती मजा मारणेच्या वकीलांनी युक्तिवाद करताना मला सीसीटीव्ही फुटेज दाखवावं, असं म्हटलं आहे, तर सीसीटीव्ही नसेल तर ऑडियो क्लिप ऐकवावी ज्यात म्हणलं आहे, त्याला मारा असा जोरदार युक्तीवाद गजा मारणेच्या वकीलांनी केला आहे. न्यायालयाने युक्तीवाद ऐकल्यानंतर गजानन मारणे याला पुणे न्यायालयाने 3 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
Rashmika Mandanna: साऊथ अभिनेत्री रश्मीका मंदानाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, ५ महागड्या गाड्या
Amol Kolhe: स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला? अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा