विरोधी पक्ष नेते आणि भाजपला अपेक्षित असलेल्या नेत्यांवर आरोप करून त्यांना नामोहरण करण्यात किरीट सोमय्या प्रसिद्ध आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतेच मालेगाव आणि छत्रपती संभाजी नगरसह सिल्लोड शहराच्या काही भागांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी या भागातून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखले दिल्याचा आरोप केला आहे. तर त्यांनी सांगितलेली संख्या लाखांत आहे.
या प्रकरणी किरीट सोमय्या म्हणाले की, दोन लाख हजार अर्ज आहेत त्यात ३७ तालुक्यात जाऊन आलो किंवा माहिती मिळवली, त्यात ९९% रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम आहेत. कोणताही पुरावा नाही आणि हे कटकारस्थानमध्ये मालेगावमध्ये सुरू झाले. एटीएसला या कामाची चौकशी करण्यास सुचवले आहे. दोन लाख प्रमाणपत्र थांबवणे, चौकशी होऊन बांगलादेशी यांना परत बांगलादेशला पाठवण्यात जाणार आणि हा गेम प्लान करणारे मालेगावमध्ये जो बँक घोटाळा झाला होता त्यातून हे पैसे आले आहेत. काल २३ जानेवारीला मालेगाव तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना सस्पेंड करण्यात आले, आणखीन काही ठिकाणी हे सस्पेन्शन होणार आहे, एका बाजूला अधिकाऱ्यांवर कारवाई दुसऱ्या बाजूला या बांगलादेशींना परत पाठवायचं आणि तिसऱ्या बाजूला यापुढे देताना व्यवस्थित लक्ष ठेवून देण्यात यावे.
यवतमाळला १३,५०० लोकांना देण्यात आले तर अमरावती आणि अकोल्यात १५,००० लोकांना देण्यात आले. अंजनगाव सुर्जीमध्ये १४०० लोकांना दिले तर त्यात सर्व १४८३ बांगलादेशी मुस्लिम आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेस- उद्धव ठाकरे शिवसेनेच्या लोकांनी आणि बांगलादेश सीमेवरील एजंट यांनी मोठा गेम प्लान तयार केला आणि जुलैनंतर ठीक ठिकाणी आचारसंहिताचा काळ असताना लोकसभेत याचा विजय झाला होता म्हणून त्यांचे सरकार येणार, त्या चार-पाच महिन्याच्या काळात महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्याच्या अर्ज या लोकांनी उशिरा जन्मप्रमाणपत्र देण्यात आले आहे. मालेगावमध्ये गेलो होतो तेव्हा ही बाब पुढे आली, दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचे कारस्थान झालं आहे. मालेगावचे तहसीलदार नायब तहसीलदार यांना सस्पेंड करण्यात आले आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.
हे ही वाचा :