spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

UPSC च्या पूर्व परीक्षेची अधिसूचना जाहीर; (इतक्या) जागा रिक्त जाणून घ्या सविस्तर माहिती

UPSC Civil Services Exam 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने २२ जानेवारी म्हणजे आज यूपीएससीच्या पूर्व परीक्षेची अधिसूचना जाहीर केली असून एकूण ९७९ पदांच्या भरतीचीही अधिसूचना जाहीर केली आहे. यंदाच्या पदांची संख्या गेल्या तीन वर्षांपेक्षा कमी आहे. यूपीएससी सिव्हिल २०२५ पूर्व परीक्षेसाठी उमेदवार २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान अर्ज करू शकतात. upsc.gov.in. यावर जाऊन उमेदवारांनी अर्ज करावा. या परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये ३८ पदे अपंग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी तब्बल १२ जागा अंध आणि कमी दृष्टी असलेल्या उमेदवारांसाठी आहे, तर ७ जागा कर्णबधिर उमेदवारांसाठी आहे. १० जागा सेलेब्रल पाल्सी, कुष्टरोग बरा झालेले उमेदवार, त्याचबरोबर लोकोमोटर अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी रिक्त ठेवण्यात आले आहे.

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२५ रोजी २१ वर्ष आणि ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९३ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००४ नंतर झालेला नसावा.

ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाल्यामुळे १० दिवसांपेक्षा आधी काढलेला फोटो अपलोड करू नये, यूपीएससीकडून उमेदवारांना सांगण्यात आले आहे. उमेदवारांना त्याचा फोटो हा १२ जानेवारी २०२५ च्या नंतर काढलेला आहे का? हे पाहावे लागणार आहे. तसेच फोटोवर उमेदवाराचे नाव आणि फोटो कोणत्या तारखेला काढलेला आहे हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असणार आहे. अर्जदारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आला आहे. अर्ज केल्यानंतर उमेदवार १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आपल्या अर्जात दुरुस्ती ही करू शकतात.

यूपीएससी सिव्हिल २०२५ परीक्षेसाठी अर्ज कसा करावा?

Latest Posts

Don't Miss