Thursday, November 23, 2023

Latest Posts

कुणबी नोंदी शोधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार मोहिम सुरु

कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम करा दरम्यान, कुणबी नोंदी तपासण्यसाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश तसेच तपासलेल्या अभिलेख्यांचा अहवाल दररोज सादर करा,

मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी (Kunbi Certificate In Kolhapur) मागणी केल्यानंतर राज्य सरकार गॅसवर आहे. त्यामुळे राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर कसरत सुरु आहे. ज्या आरक्षणाचा पाया रचला त्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये (Kunbi Certificate In Kolhapur) 5 हजार 566 नोंदी सापडल्या आहेत.

कुणबी नोंदी शोधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 5 हजार 566 नोंदी सापडल्या आहेत. सर्वाधिक नोंदी या कागल व करवीर तालुक्यातील आहेत. दरम्यान, सुरुवातालीच हजारो नोंदी सापडल्याने मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात आढळतील, असा अंदाज वर्तववण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सर्व तहसील कार्यालयांसह कोल्हापूर पुरालेखागार कार्यालय व कळंबा कारागृहातील नोंद वहीमध्येही कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या नोंदी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हे या कक्षाचे समन्वय अधिकारी असणार आहेत. तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यासह जेलचे पोलिस कर्मचारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी अशा वेगवेगळ्या गटातील सर्व कर्मचारी सध्या कुणबी नोंदीचा शोध घेत आहेत. त्यासाठी सर्व रेकॉर्ड तपासून पाहिले जात आहे.

कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम करा
दरम्यान, कुणबी नोंदी तपासण्यसाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश तसेच तपासलेल्या अभिलेख्यांचा अहवाल दररोज सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेली मोहीम संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, मराठवाड्यात तपासण्यात आलेल्या नोंदीच्या धर्तीवर कुणबी नोंदी तपासण्यासाठी मिशन मोडवर मोहीम राबवा. त्यासाठी सर्व विभागांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन कार्यवाही गतिमान करा. त्याचबरोबर सर्व विभागांच्या अधिकाऱ्यानी समन्वयाने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. कुणबी नोंदीच्या अभिलेखांचे तसेच मोडी, उर्दू लिपीतील अभिलेखांचेही भाषांतर करुन डिजिटायजेशन करुन संवर्धन करा. यासाठी पुराभिलेखागार कार्यालय व शिवाजी विद्यापीठाचा भाषा विभागाच्या माध्यमातून अधिकृत मोडी लिपी भाषिक, वाचक यांची मदत घ्या, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

कुणबी नोंदी तपासणी करताना कोणकोणते अभिलेख तपासावे तसेच याबाबतची कार्यपद्धती कशा पद्धतीने राबवावी याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : 

दिवाळीकरा पण फटाक्यांन शिवाय पालकमंत्री केसरकर यांचे आवाहन

दोन उपमुख्यमंत्री पण विठुरायाची महापूजा कोण करणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss