Sunday, November 19, 2023

Latest Posts

KOLHAPUR: केंद्र सरकारकडून मधाच्या गावाची पर्यटनाच्या यादीत नोंद

सूर्यफुलावरचा मध, जांभूळ मध असे मधाचे अनेक प्रकार पाटगावात पाहायला मिळतात. या गावांमध्ये आधी पारंपारिक पद्धतीने मध गोळा केला जायचा, मात्र आता त्याला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. तरुण वर्ग मोठ्या संख्येने या व्यवसायाकडे उतरला आहे. या एका गावामध्ये वर्षभरात जवळपास दहा टन मध निर्मिती केली जाते.

कोल्हापूर जिल्ह्याच्या (Kolhapur District) पश्चिमेला एका गाव आहे, जे आता राष्ट्रीय (National)आणि आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर झळकणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव (Patgaon) हे मधाचे गाव (Village of Honey) म्हणून ओळखले जाते. केंद्र सरकारने मध आणि पर्यटनाच्या (Tourism) यादीतील महत्त्वाचे गाव म्हणून, या गावाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या गावाची चर्चा होतांना दिसून येत आहे. कोकणच्या वेशीवर असलेलं तसेच शिवकाळात महत्त्व लाभलेलं पाटगाव. आता मधाचं गाव झालं आहे. पूर्वीपासूनच या गावात मधाची निर्मिती केली जात होती. भट शेती वगळून उत्पादनाची कोणतीच साधने या गावात उपलब्ध नव्हती. म्ह्णूनच येथील गकार्यानी मधाची निर्मिती करण्याचे ठरवले. मानवी हस्तक्षेप आणि निसर्ग बदलामुळे येथील मधाची निर्मिती संपुष्टात आली होती. पण आता या गावाने पुन्हा एकदा मध उत्पादनाची सुरुवात केली आहे. गावकऱ्यांना आता जिल्हा प्रशासनाचीही मदत मिळाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मध आणि पर्यटनाच्या यादीतील महत्त्वाचे गाव म्हणून या गावाची निवड केली आहे.

अलीकडे मधामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका शुद्ध मध निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना बसतो. मात्र भेसळ असलेला मध आणि शुद्ध मध कसा ओळखायचा ते देखील सांगितले जाते.  पाटगावमध्ये मध निर्मिती मोठ्या प्रमाणात होते,  मात्र त्याला अजूनही पारंपारिक मार्केट आहे. ज्यांना तिथल्या मधाची गोडी माहिती आहे. तेच या ठिकाणी येऊन मध घेतात. मात्र आता याला व्यापक रूप दिले जाणार आहे. त्यामुळे मधपाळ देखील आनंदात आहेत..मधाचं गाव पाटगाव या ठिकाणी अनेक प्रकारचे मध मिळतात. औषधी वनस्पती कारवीवरील मध तर सात वर्षांनी एकदा मिळतो. त्याचबरोबर सूर्यफुलावरचा मध, जांभूळ मध असे मधाचे अनेक प्रकार पाटगावात पाहायला मिळतात. या गावांमध्ये आधी पारंपारिक पद्धतीने मध गोळा केला जायचा, मात्र आता त्याला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. तरुण वर्ग मोठ्या संख्येने या व्यवसायाकडे उतरला आहे. या एका गावामध्ये वर्षभरात जवळपास दहा टन मध निर्मिती केली जाते.

हे ही वाचा : 

कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss