spot_img
spot_img

Latest Posts

MNS च्या जागर यात्रेत कोकणकन्या Ankita Walawalkar ने लावली हजेरी

मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची सुधारणा करण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. मागचा १२ ते १३ वर्षपासून या मार्गावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची सुधारणा करण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. मागचा १२ ते १३ वर्षपासून या मार्गावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गासाठी तब्ब्ल १५ हजार कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा महामार्ग पूर्ण झाला नाही आहे. याचा त्रास प्रत्येक कोकणकरांना सहन करवा लागत आहे. आत्ता मुंबई गोवा मार्गाचे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेचा जागर यात्रेला पनवेल पळस्पेमधील पळस्पे फाट्यापासून सुरुवात झाली आहे. या यात्रेत मनसेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत. तर कोकणची लेक म्हणजेच कोकणकन्या अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Walawalkar) ही देखील मनसेचा जागर यात्रेत सहभागी झाली आहे. अंकिता प्रभू-वालावलकर ही कोकणकरांचा समस्या मांडण्यासाठी गेली आहे. तळ्यात मळ्यात आणि संगीत खुर्चीचा खेळ आटोपला असेल तर आमचा महामार्गावर लक्ष द्या अशी टीका अंकिता प्रभू-वालावलकर हिने केली आहे. अमित ठाकरेंचा नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या यात्रेला रायगड, रत्नागिरीतुन पाठिंबा मिळतोय.

कोकणकन्या अंकिता प्रभू-वालावलकरने (Ankita Walawalkar) या यात्रेत गाऱ्हाणं घातलं तेव्हा ती म्हणाली,” तळ्यात मळ्यात आणि संगीत खुर्चीचा खेळ आटोपला असेल तर आमच्या महामार्गाच्या प्रश्नावर लक्ष पडू दे रे महाराजा….

तात्पुरत्या खुर्चीचा खेळ आख्खो महराष्ट्र बघता पण तात्पुरती मलमपट्टी करुची बंद करा रे महाराजा…

मुंबई गोवा महामार्गाचे जे काही प्रश्न असत जे काय अडचणी असतील ते दूर कर… चांद्रयान चंद्रावर खड्डे आणि पाण्याचा तपास करीलच पण आमच्या महामार्गावरील खड्डे आणि पाण्याच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष पडून दे रे महाराजा…

मुंबईत धावणारे चाकरमानी आणि कोकणात येणारे पर्यटक जीव धोक्यात घालून महामार्गावर प्रवास करत आहे… कित्येक जणांचे जीव गेले आहेत त्यामुळे ही थुकपट्टी बंद करुन एकदा चतुर्थीच्या आधी चाांगला महामार्ग दाखव रे महाराजा …..

अंकिता प्रभू-वालावलकर ही तिचा व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने मालवणी भाषेत बनवलेले व्हिडिओ लोकांना फार आवडतात. पण तिने मनसेचा जागर यात्रेत सरकारवर टीका केली आहे. या आधी देखील तिने कोकण संबधित काही व्हिडिओ बनवून कोकणकरांचा समस्या मांडल्या आहे. तिचा या हटके अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. कोकणकन्या अंकिता प्रभू-वालावलकर ही सोशल मीडियावर सगळ्यांची लाडकी झाली आहे. ती तरुणाई मध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे. अंकिता कोकणातील फूड, ट्रॅव्हल यासारख्या विषयावर मालवणी भाषेत व्हिडिओ बनवते. इंस्टाग्राम, युट्यूबवर तिचे लाखोमध्ये फॉलोअर्स आहेत.

हे ही वाचा:

२०२४ मध्ये भाजप सत्तेत येणार नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल…

अहमदनगरमधील तरुणांवर चोरीच्या संशयावरून अमानुष मारहाण

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss