Pune : दरवर्षीप्रमाणे १ जानेवारीला पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात कोरेगाव भीमा अभिवादन सोहळा साजरा केला जातो. कोरेगाव भीमा येथे २०७ वा शौर्य दिन साजरा केला जाणार आहे. शौर्य दिनाबद्दल कोरेगाव भीमा येथे जोरदार तयारी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन यंत्रणा नियोजित करून तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा विजय स्तंभाला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावट करून हा स्तंभ सजवण्यात येतो त्याचबरोबर रोशनाईही करण्यात येते. विजय स्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला असून या सोहळ्याला जवळपास ८ ते १० लाख अनुयायी येणार असल्याचे प्रशासनाकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, सुमारे ५ हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
कोरेगाव भीमा विजयस्तंभ सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी उपस्थित राहतात. या सोहळ्याला ३१ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे, आज सकाळपासून या ठिकाणी भीमा अनुयायी येत असून विजयस्तंभा जवळ गर्दी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. या वर्षीही ८ ते १० लाख अनुयायी येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मोफत बस सेवा आणि पार्किंगसाठी सोय :
कोरेगाव भीमा विजयस्तंभ सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांची गैरसोया होऊ नये त्याचबरोबर व्यवस्थित अभिवादन व्हावे यासाठी मोफा बस सेवा सुरु करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य सेवा, स्तनदा मतांसाठी हिरकणी कक्ष , जेष्ठ नागरिकांसाठी निवारा कक्ष, शौचालाय सुविधा, पाण्याची सोय अशा अनेक सोइ-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या स्थळावर कोणतीही घटना घडू नये यासाठी विशेष अधिकारी आणि १७ समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शौर्य दिनानिमित्त ४५ पार्किंग सेंटर आहेत. ३० हजार चारचाकी आणि ३० दुचाकी क्षमता असलेले सेंटर उभारण्यात आले आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका