spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले मुलाच्या खात्यावर; कुटुंबाने दाखवला प्रामाणिकपणा

राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात विविध माहिती समोर येत असताना धुळे तालुक्यातील नकाणे गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबाचा या योजनेतून प्रामाणिकपणा समोर आला आहे.

राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात विविध माहिती समोर येत असताना धुळे तालुक्यातील नकाणे गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबाचा या योजनेतून प्रामाणिकपणा समोर आला आहे. नकाणे गावातील रहिवाशी असलेल्या मुलाच्या नावे असलेल्या योगित खैरनार यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर सदर महिलेने आणि तिच्या मुलाने हे पैसे शासनाला जमा केल्याचा हा प्रकार समोर आला आहे.

धुळे तालुक्यातील नकाणे गावातील रहिवाशी असणाऱ्या भिकुबाई प्रकाश खेरणार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज केला, मात्र हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जासाठी आधार कार्ड जोडताना भिकुबाई यांचे आधार कार्ड ऐवजी चुकून त्यांच्या मुलाचे आधार कार्ड जोडले गेले होते. यामुळे काही दिवसातच त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या खात्यावर तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाले होते, मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर भिकुबाई यांच्या मुलाने हे पैसे आपल्या खात्यावर कसे आले याबाबत पडताळणी केली असता आपले आधार कार्ड त्याला जोडले गेल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला.

याबाबत खैरनार कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे पैसे परत करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याची तात्काळ दखल घेत त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून एका चलनाद्वारे खैरनार कुटुंबाला आलेले पैसे शासनाला जमा केले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज भरला जात असताना मुलाचे आधार कार्ड दिले गेल्यानंतर त्याच्या खात्यावर पैसे जमा झाले मात्र हे पैसे आपल्याला नको असे त्यांनी मला सांगितल्यानंतर आपण देखील हे पैसे परत करण्याबाबत सांगितले. त्यानंतर माझे आधार कार्ड जोडून लाडकी बहि‍ण योजनेचा अर्ज भरल्यानंतर आता माझ्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी प्रतिक्रिया भिकुबाई खैरनार यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केल्यानंतर आता त्याची शासनाकडून नियमावली देखील जाहीर करण्यात आली, मात्र अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे शासनाचे पैसे परत करण्याचा प्रामाणिकपणा भिकुबाई खैरनार यांनी दाखवला मात्र भिकुबाई खैरनार या अपात्र झाल्याने त्यांचे पैसे काढून घेण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते.

हे ही वाचा:

भाजप आमदार Suresh Dhas यांचा इशारा; गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी

Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss