spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार

आता २१०० रुपये कधीपासून मिळणार, त्याचे वेध बहिणींना लागले आहे. महायुतीसाठी गेमचेंजर ठरनाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१०० रुपये कधी देणार असा सवाल विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला विचारला.

Ladki Bahin Yojana: राज्यात लाडकी बहीण योजना सर्व योजनांमध्ये महत्त्वाची व मोठी समजली जाते. २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी हे योजना लागू करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली. या निवडणूक जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यामुळे आता २१०० रुपये कधीपासून मिळणार, त्याचे वेध बहिणींना लागले आहे. महायुतीसाठी गेमचेंजर ठरनाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१०० रुपये कधी देणार असा सवाल विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला विचारला.

ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब, काँग्रेसचे सतेज पाटील, भाई जगताप आणि शशिकांत शिंदे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहावी लागणार असं दिसतं. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिली जाणारी रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० करणार असल्याचं म्हटलं होते. मात्र आता याच्या अंमलबजावणी बद्दल सभागृहात विचारले असता त्याबाबत महिला ब बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली.

आदिती तटकरे यांचे सभागृहातील उत्तर
राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहिरनामा हा ५ वर्षांचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र सध्या २१०० रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे. आदिती तटकरे यांच्या सभागृहातील वक्तव्याने लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे. परंतु सर्व महिलांना फेब्रुवारी आणि मार्च माहिन्याचा १५०० असा दोन महिन्यांचा हप्ता म्हणजे ३००० रुपये महिला दिनापूर्वी मिळणार आहे. तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही याच निकषांनुसार पार पडत असल्याचे महिला ब बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात सांगितले. या चर्चेत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, अशोक उर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, चित्रा वाघ यांनी सहभाग घेतला.

Latest Posts

Don't Miss