Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या अपात्र महिलांची संख्या ९ लाख होणार आहे. यापूर्वी ५ लाख महिलांची नवे कमी करण्यात आली होती. मात्र आता नव्याने ४ लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ५ लाख महिला आहेत. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त ५०० रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर नमो शेतकरी योजनेतून १००० रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे, त्याप्रमाणेच वाहनं असलेल्या अडीच लाख महिलांना देखील वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या महिलांना ही वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नवे नियम
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचे सहाय्य निधी देण्याची योजना आखली. विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली, साधारण २ कोटी ११ लाख ८६० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या मात्र आता याच महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून काही अटी लागून करण्यात आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करुन हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांचा या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे.
दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना वगळण्यात येणार आहे.
नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे.