महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि त्यामुळेचं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी आता योजनेचे लाभ थांबवण्यासाठी विनंती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत.
महायुती सरकारची बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या पडताळणी पूर्वीच ४ हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्याने महिलांनी माघार घेतल्याचे समोर आले आहे. योजनेचा लाभ थांबवण्यासाठी देखील विंनती अर्ज शासकीय कार्यालयात दाखल झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र, आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.
योजनेचे पैसे थांबवण्याची महिलांची विनंती
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी आधीच राज्यातील ४ हजार महिलांनी आपला अर्ज मागे घेतले आहेत. पैसे परत करावे लागतील या भीतीनं लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेस पात्र नसणाऱ्या बहिणींनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, या भीतीनं महिलांनी अर्ज मागे घेण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेचे सरसकट पैसे मिळत होते मात्र निवडणुकीनंतर या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जांची फेरतपासणी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल होणार का?
लाडकी बहीण योजनेस अपात्र असलेल्या महिलांकडून दंड वसूल करण्याच्या चर्चा काही दिवसांपासून समोर आल्या आहेत. मात्र आता सरकारतर्फे यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही आणि तसा सरकारचा कोणताही विचार नाही, असे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती