Ladki Bahin Yojana: सर्वाधिक लोकप्रिय असलेली राज्यातील लाडकी बहीण योजना रोज नवीन मुद्द्यांमुळे चर्चेत असते. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. राज्यातील अल्प उत्पन्न प्रवर्गातील भगिनींना केंद्रस्थानी ठेऊन ही योजना आणण्यात आली व विधानसभा निवडणुकीच्या आधी फारसे काटेकोर निकष न लावता २ कोटी ६० लाख महिलांना प्रती दर महा १५०० रुपये देण्यात आले. माय-भगिणींनी प्रचंड खुष होऊन राज्यात महायुती सरकार निवडून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. दरम्यान, निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने त्यांच्या पंचसुत्रीमध्ये लाडक्या बहिणींना केंद्रस्थानी ठेऊन राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर लाडक्या बहीणींना २१०० रूपये देणार असल्याचे जाहीर केले. साहजिकच त्याचा फायदा निवडणुकीत महायुती सरकारला झाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात लाडक्या बहीणीमुळे महायुती सरकारला कधी नव्हे इतकं प्रचंड संख्याबळ मिळाले.परंतु निवडणुकीनंतर लगेचच या योजनेचे निकष बदलण्यात आले. खरंतर ही मूळ योजना पहिल्यांदा राबवण्यात आली शेजारच्या मध्यप्रदेशात. तिथे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना तिथे सुरू केली. तिला तुफानी यश मिळालं आणि भाजपने मध्यप्रदेशात हॅट्ट्रिक केली. त्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भात महाराष्ट्रात मात्र रोज नवीन नियम लागू करण्यात येऊ लागले. नेमके काय आहेत निकष? कोणत्या मुद्द्यांवर लाडक्या बहीणीचे पैसे अडकणार जाणून घेऊया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ९ लाख महिला कमी होणार आहेत.या आधी ५ लाख महिलांची नावे पुणे विभागातून कमी करण्यात आली होती. आता नव्याने ४ लाख महिलांची नावे कमी होणार आहेत. त्यामुळे राज्यसरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे अर्थसंकल्पीय तिजोरीवर योजना जाहीर झाली. तेव्हा ५२ हजार कोटींचा भार पडला आहे. राज्यावर वाढता कर्जाचा डोंगर पाहता अनेक योजना बंद होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवभोजन थाळी व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘आनंदाचा शिधा’ या योजनांचाही समावेश आहे. या योजनांचा गरिबांना उपयोग होत असल्याने अनेकांनी या योजना बंद करायला विरोध दर्शविला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत.
१. ज्या महिलांच्या घरी ४ चाकी वाहन आहेत त्यांना फेरतपासणी करून अपात्र ठरवण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत अडीज लाख महिला फेरतपासणी दरम्यान आढळल्या आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
२. ज्या महिला सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असतील आणि लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत असतील तर त्यांना दोन्ही योजना मिळून १५०० रुपये मिळतील. म्हणजे जर तुम्ही नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर, लाडक्या बहीण योजनेतील फक्त ५०० रुपयेच तुम्हाला मिळणार व नमो शेतकरी योजनेतून १००० रुपये मिळणार. अश्या लाभ घेणाऱ्या ५ लाख महिला आहेत.
३. त्याचप्रमाणे दिव्यांग विभागातून लाभ घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे.
४. पात्र महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे. दरवर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान ही ई-केवायसी करावी लागणार आहे.
५. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे. तरीदेखील सरकारी विविध योजनांचा लाभ घेतात. त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. लाभार्थी महिलांचे उत्पन्न अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार आहे.
६. नव्याने पात्र झालेल्या तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे. यांसारखे अनेक निकष लाऊन सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात आहेत.
यात आता विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर लाडकी बहीण योजनेवरून टीका केली आहे. राज्य सरकारच्या या निकषांमुळे लाडक्या बहिणी मात्र नाराज असल्याचे दिसत आहे.
Narendra Modi : RSS मुळे माझा मराठीशी संबंध म्हणत, नरेंद्र मोदींनी केला मराठी भाषेचं कौतुक
Follow Us