spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळणार डिसेंबरची ओवाळणी? सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Ladki Bahin Yojana: अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरला पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी सांगितले. पण आता या लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे कधी मिळणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं आहे. यावेळी विधानसभेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबात माहिती दिली आहे. या हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर ते म्हणाले, “आम्ही जी आश्वासन दिली आहेत ती आम्ही नक्की पूर्ण करणार. कुणीही मनात शंका ठेवू नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे”, अशी फडणवीस म्हणाले. मात्र, आता लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार असा प्रश्न पडला आहे.

आता अधिवेशन संपलं, डिसेंबर महिना देखील संपत आला, तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. सरकारच्या निर्णयाकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलं आहे. या योजनेचे काही नियम ठरवण्यात आले होते त्यामुळे महिलांना दर महिना १५०० रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे ७५०० रुपये महायुती सरकारने महिलांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा केले होते.

त्यानंतर राज्यात विधानसभा आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. पण आता लाडक्या महिलांना डिसेंबर महिन्याची रक्कम कधी मिळेल असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारकडून महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर १५०० या रक्कमेत वाढ करून २१०० केली जाणार असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, आता महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या रक्केमत कधी वाढ होणार याची उत्सुकता महिलांना लागलेली आहे. मार्चमध्ये राज्याचं अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या रकमेत वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेचे १५०० की २१०० रुपये मिळणार?
महिलांना अर्थसंकल्पानंतर २१०० रुपयांप्रमाणं रक्कम मिळू शकेल. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा १५०० रुपये मिळतील.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
* वय २१ ते ६० वर्षे
* दरमहा १५०० रुपये मिळणार
* दरवर्षी शासन ४६,००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
* अंमलबजावणी : जुलै २०२४ पासून

कोण असणार पात्र आणि अपात्र?
* महाराष्ट्र रहिवासी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे
* ६० वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र?
* २.५०लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात ५ एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे ४ चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss