Saturday, December 2, 2023

Latest Posts

राज्यव्यापी मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका लालपरीला

राज्यव्यापी मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका लालपरीला

राज्यभरात मराठा आंदोलन पेटलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत, महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात जागोजागी रास्ता रोको आणि साखळी उपोषण करण्यात येत आहे. याच आंदोलनादरम्यान एसटीला या विशेष लक्ष केले जात आहे. यामुळे राज्य परिवहन मंडळ पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेलं आहे. कोरोनाच्या काळानंतर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केलं होतं ज्यामुळे महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. ती परिस्थिती सुस्थितीत येत असतानाच पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनामुळे एसटी महामंडळाला सुमारे २० कोटींचं नुकसान झालेलं आहे.

लालपरीला मराठा आंदोलनाचा फटका

गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत होती ज्यामुळे एसटीला पुन्हा चांगले दिवस आले होते. परंतु राज्यव्यापी मराठा आंदोलन हिंसक वळणावर पोहोचलं त्यामुळे याचा थेट फटका एसटी महामंडळाला बसला आहे. यामुळे एस्टीमहामंडळाला आत्तापर्यन्त सुमारे १७ ते २० कोटींचं नुकसान झालेलं आहे.

नागपूर विभागातुन मोठे नुकसान

मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका नागपूरमध्ये एस्टी महामंडळाला बसलेला आहे. राज्यात गाड्यांची जाळपोळ आणि गाडीवर दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे नागपूर विभागातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस फक्त पुसदपर्यंत पाठविण्यात येत आहेत. यामुळे नागपूर एसटी विभागाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

येवला आगारातून देखील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या

नाशिक जिल्ह्यातील येवला आगारातून जवळपास १३२ एसटी बसेस रद्द करण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे येवला आगाराचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. या एसटी फेऱ्या रद्द झाल्याने शाळकरी मुलांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झलेलं आहे.

हे ही वाचा : 

CENTRAL RAILWAY: रेल्वे रूळ ओलांडाल तर काळे व्हाल

KALYAN CRIME: सामान उधार न दिल्याने केली मारहाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss