spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या समोर चिमुरडीचा मृत्यू

अहिल्यानगरच्या पारनेर जिल्ह्यात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नऊ वर्षीय मुलगी लघु शंकेसाठी गेलेली. त्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यात खडकवाडी येथे हीघटना घडली. काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. ईश्वरी पांडुरंग रोहकले असे या मुलीचे नाव असून वडिलांसोबत ती घराच्या पडवीत होती.

नेमकं काय घडलं

ईश्वरी आणि तिचे वडील पडवीत होते. ती लघु शंकेसाठी बाजूला गेली असता मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत तिला ओढत पिकात नेले. त्यानंतर तिचा आवाज ऐकल्यावर वडिलांनी बचावासाठी धाव घेतली. मात्र बिबट्याच्या तावडीतून तिला सोडवण्यात कसंतरी यश आले. परंतु उपचारसाठी नेले असता त्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. या घटणेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पासरलं आहे. बिबट्याची दहशत लक्षात घेता वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

तपासासाठी तीन पथकांची नियुक्ती

पुढे आलेल्या माहितीनुसार, या घटनेत अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खून झालेले दोघे आणि जखमी असलेला कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत, तर खून झालेले आणि ज्यांनी हल्ला केला या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्ह्यातील हवे असलेले इतर गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss