ड्रग्ज व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असो, त्याला ठेचून काढलंच पाहीजे असे वक्तव्य राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. जे आमदार, खासदार होतील, त्यांच्या कुटुंबात अमली पदार्थांचं लायसन्स असता कामा नये. काँग्रेसच्या नेत्यांची मी यादी देऊ शकतो ज्यांच्याकडे असे लायसन्स आहेत असेही मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, ड्रग्ज विषयात कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेबाबात मुनगंटीवार यांनी विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, एखाद्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा व्यक्त करण्यात गैर काहीच नाही.
अपात्रतेच्या सुनावणीत काही अघटीत घडायचंच असेल तरी त्याचा मुख्यमंत्रीपदाशी काहीच संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंच आहे की विधानपरिषदेचा मार्ग मोकळा आहे. एकनाथ शिंदेंच्याच माध्यमातून २०२४ च्या निवडणूका लढवणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत .
मंत्रीमंडळाचा विस्तार चाय पे चर्चा करुन होत नाही
मंत्रीमंडळाचा विस्तार चाय पे चर्चा करुन होत नाही, अमितभाई, मुख्यमंत्री आवश्यक असेल तिथे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मदत घेऊन मंत्रीमंडळ विस्तार होईल असे मुनंगंटीवार म्हणाले. राज्यातील सत्ता संघर्षाबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानं अमुक एका बाजुनं निर्णय द्या, असं सांगितलं नाही. निर्णय वेगानं व्हावा ही सर्वसामान्यां भावना असू शकते असे मुनंगटीवार म्हणाले. जो हारणारा असतो तो निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटण्याचा आरोप करतोच. भाजपचा कोणी कार्यकर्ता काटेवाडीत प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करत असतील तर तो हारणारा असेल. आम्ही जर प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करत असु तर पराभवाच्या मानसिकतेत जात असू असे मुनगंटीवार म्हणाले.
मी एक प्रस्ताव तयार करतोय की सर्व जातीच्या प्रमुखांना एकत्र घेऊन आपापल्या जातीच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करायचा असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत पॉलिटीकल चर्चा होऊ नये, सकारात्मक चर्चेकरता मी तयार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.