पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका २६ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करून पळ काढणारा नराधम दत्तात्रय गाडे याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. त्याला हुडकून काढण्यासाठी पुणे पोलिसांची १३ पथके तयार करण्यात आली आहे. पुणे पोलिसांचा २ पथक शिरूर येथे पाठवण्यात आला आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी दिली आहे. अशातच आता पुणे पोलिसांच्या हाती आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबाबत महत्त्वाची माहिती लागली आहे. पोलिसांना दत्तात्रय गाडे याचे शेवटचे लोकेशन समजले आहे.
स्वारगेट डेपोत शिवशाही बसमधे तरुणीवर दत्तात्रय गाडे याने अत्याचार केला. त्यानंतर दत्तात्रय गाडे तातडीने तिथून पसार झाला आणि त्याने पुणे शहर सोडले. तो पुण्यातून थेट शिरूर जिल्ह्यातील आपल्या गावी गुणाट येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेचा शेवटचं लोकेशन गुनाट गावात आढळून आले आहे. गुन्हा घडल्याच्या दिवशी आरोपी हा स्वारगेटवरून थेट गावी गेला होता. पण आता तिथून तो नेमका कुठे गायब झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा शोध आता पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
पोलिसांच्या अंदाजानुसार आरोपी दत्तात्रय गाडे हा गुनाट गावाच्या आजुबाजूला शेतांमध्ये लपलेला असावा. म्हणून पोलिसांच्या पथकांकडून या भागात शोध मोहीम राबवली जात आहे. दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पोलिसांकडून डॉग स्क्वॉडची मदत घेतली जात आहे. गुन्हे शाखेने या सगळ्या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दत्तात्रय गाडे याचा भाऊ आणि मित्र-मैत्रिणींची चौकशी केली आहे. या सगळ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहे. दत्तात्रय गाडेच्या एका मैत्रिणीने पोलिसांनी त्याच्याबद्दल आणखी काही धक्कादायक माहिती दिली आहे.
पोलिसांनी तरुणीवरील अत्याचाराची माहिती लगेच उघड का केली नाही?
तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी बाहेर येणार नाही, याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली होती. ही बातमी बाहेर आली असती तर कदाचित आपल्याला आरोपीचे आता जे संभाव्य लोकेशन मिळाले आहे, ते मिळू शकले नसते. ही बातमी बाहेर आली असती तर आरोपी दत्तात्रय गाडे हा सावध होऊन आणखी लांब पळून गेला असता. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. पोलिसांकडून केवळ गुप्तता बाळगण्यात आली होती, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.
हे ही वाचा: