विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Legislative Council Deputy Chairman Dr. Neelam Gorhe) यांनी वडोदरा दौऱ्यावर महाराणी राधिकाराजे गायकवाड (Maharani Radhikaraje Gaikwad) यांची भेट घेतली. या भेटीत सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. वडोदऱ्याच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या महाराणी राधिकाराजे गायकवाड या सामाजिक कार्यातही सक्रिय असून, त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या भेटीत महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन,तसेच ऊसतोड महिला मजूर यासारख्या अनेक विषयांवर संवाद साधत सहकार्याची भावना व्यक्त केली.त्याचबरोबर,या भेटीमुळे महिलांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देश पातळीवर एकसंघाने काम करण्याची नवी दृष्टी निर्माण होण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील महिला विषयी भविष्यातील कार्यक्रमास आपण आवर्जून यावे अशी ईच्छा व्यक्त केली व त्यास राधिका राजे यांनी देखील कुठलेच किंतू परंतु न दाखवता मला यायला नक्कीच आवडेल असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Former Chief Minister and Deputy Chief Minister of Maharashtra Eknath Shinde) यांच्या वरील योद्धा पुस्तक डॉ.गोऱ्हे यांनी राजे यांना भेट दिले. या भेटीत डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सोबत स्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी देखील उपस्थित होत्या.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता