Maharashtra Assembly Budget Session 2025 : महाराष्ट्र विधानसभेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेता कोणाला मिळेल यासाठी सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर महाराष्ट्र विधानसभेत उद्धव ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं. अशी चर्चा आहे. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात ठाकरे गटाने विधिमंडळाकडून माहिती मागवली होती. त्याला विधिमंडळाकडून उत्तर देण्यात आलं आहे. या उत्तरात ठाकरे गट (Shivsena UBT) विधिमंडळ विरोधी पक्षनेता पदासाठी अर्ज करू शकतात.
विधानसभेत विरोधी पक्ष नेता निवडीसाठी ठराविक एक संख्याबळाची गरज नाहीय. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट तरतूद नाहीय. अशी माहिती विधीमंडळाकडून ठाकरे गटाला पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा झालाय अशी चर्चा आहे. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात कायद्यातील तरतुदींची माहिती द्यावी यासाठी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ठाकरे गटाने विधिमंडळाला पत्र लिहिलं होतं.
या पत्राला विधिमंडळाकडून उत्तर देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे, (Aaditya Thackeray) भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी हे पत्र दिलं होतं. भास्कर जाधव यांना विधिमंडळाने या पत्राद्वारे उत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट तरतूद नसल्याच म्हटलं आहे. प्रचलित संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा विचार करून विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत असतात अशी माहिती विधिमंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी १० टक्के विधानसभा सदस्य संख्या असावी लागते या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विधिमंडळाच्या या उत्तरानंतर ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेते पदासाठीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. आजपासून विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. ठाकरे गट आजच विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज देऊ शकतो.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता पण होता येणार नाही असे म्हंटले जात होते. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक २० आमदार ठाकरे गटाचे आहेत. त्या खालोखाल काँग्रेसचे १६ आणि शरद पवार यांच्या गटाचे १० आमदार आहेत. विधानसभेत मविआच एकूण मिळून संख्याबळ ४६ आहे. यात ठाकरे गटाची संख्या जास्त असल्याने विधानसभा अध्यक्षांनी मान्य केल्यास त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं.
हे ही वाचा:
Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार