spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Maharashtra Assembly Election Results 2024: टपाली मतमोजणीला सुरुवात, कोण मारणार बाजी? काय असणार महाराष्ट्राचा निकाल?

Maharashtra Assembly Election 2024: संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवार, २३ नोव्हेंबर स्पष्ट होणार आहे. राज्याच्या विधानसभेवर महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी यश मिळवणार याचे उत्तर काहीच तासात स्पष्ट होणार आहे. राज्यात तिसरी आघाडी असलेल्या परिवर्तन महाशक्तीने कश्याप्रकारे कामगिरी केली तसेच राज्यातील इतर पक्षांनी स्वबळावर लढत किती जागांवर बाजी मारली हेदेखील स्पष्ट होणार आहे. ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्यात कोणाचा गुलाल उधळणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे तसेच देशाचे लक्ष लागले आहे. अशातच, ८ वाजल्यापासून टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक मतमोजणीची विशेष तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात फेरीनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील १८४ उमेदवारांचे भविष्य आज ठरत आहे. जिल्ह्यातील मतमोजणी केंद्राच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मातब्बर उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बार्शी, सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत सविस्तर निकाल लागण्याची शक्यता आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अमरावतीच्या लोकशाही भवनात अमरावती व बडनेरा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. सर्व मतदार संघाची प्रत्येकी १४  टेबलवर मतमोजणी सुरु आहे. लोकशाही भवनासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss