spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

‘Maharashtra Bhushan Purskar 2024’ लवकरच जाहीर होणार….!

राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी आलेल्या शिफारशींमधील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी मोलाचे योगदान आहे.या पुरस्काराचा अंतिम निर्णय सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना केली.

Mumbai, 12March – राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी आलेल्या शिफारशींमधील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी मोलाचे योगदान आहे.या पुरस्काराचा अंतिम निर्णय सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना केली.

विधानभवनात निवड समितीची बैठक
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कार निवडीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ.अनिल काकोडकर,ॲड.उज्ज्वल निकम (दूरदृश्यप्रणालीद्वारे),वासुदेव कामत, गो.ब.देगूलकर आणि डॉ.शशिकला वंजारी उपस्थित होते.

त्यानंतर त्या बैठकीची माहिती देताना
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र भूषण पुरस्कार (‘Maharashtra Bhushan Purskar 2024) हा कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.शासनाला प्राप्त शिफारसी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यातील एकाची निवड करणे कठीण कार्य आहे.पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी सुचविलेली नावे लक्षात घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.”असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आजच्या या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पुरस्कार निवड प्रक्रियेबाबत सादरीकरण केले. तसेच, निवड समितीच्या अशासकीय सदस्यांनी आपापली मते मांडल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : 

Holi 2025: युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी होळी निमित्त ‘आई माऊलीचा उदो उदो’ गाण्यावर धरला ठेका

Holi 2025: होळीच्या रंगांपासून काळजी कशी घ्यायची

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss