Saturday, April 20, 2024

Latest Posts

Maharashtra Board HSC Result 2023, बारावीच्या निकालात मुंबई पडली कमी, तर इतर विभागाचं काय?

यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेत १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. हा निकाल मागील वर्षापेक्षा कमी आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८९.१४ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.

गेल्या अनेक दिसवसांपासून विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष हे लागले होते. आज अखेर दुपारी २ वाजता बारावीचा निकाल हा जाहीर झाला आहे. यंदा बारावी बोर्डाचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेत १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. हा निकाल मागील वर्षापेक्षा कमी आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८९.१४ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.

या वर्षी देखील कोकण विभागानेच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल ८८.१३ टक्के लागला आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ही ९३. ४३ टक्के लागला आहे. तर खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ही ८२.३९ टक्के आहे. तसेच नेमकता कोणत्या राज्याचा किती निकाल लागला आहे ते आपण जाणून घेऊया.

बारावीचा विभागवार निकाल

कोकण – ९६.०१ टक्के
पुणे – ९३.३४ टक्के
कोल्हापूर – ९३.२८ टक्के
औरंगाबाद – ९१.८५ टक्के
नागपूर – ९०.३५ टक्के
अमरावती – ९२.७५ टक्के
नाशिक – ९१.६६ टक्के
लातूर – ९०.३७ टक्के
मुंबई – ८८.१३ टक्के

 

कसा चेक कराल आपला निकाल?

  • महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.
  • बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
  • तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.
  • तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.
  • एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
  • निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

पुनर्परीक्षेसाठी २९ जूनपासून अर्ज

जुलै-ऑगस्टमध्ये हाेणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षा देणारे विद्यार्थी आणि श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी २९ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

अखेर प्रतीक्षा संपली!, HSC चा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss