Maharashtra Budget 2025 News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आज फडणवीस सरकारला १०० दिवस पूर्ण होत आहेत. महायुती सरकारचे हे पहिलेच पूर्ण अधिवेशन आहे.अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला विविध आश्वासन दिली होती. त्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पातून होते का ते पाहावं लागेल. राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ २१०० रुपये देणे, शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ अश्या प्रमुख घोषणा तीन घोषणा होत्या. याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे.
अर्थसंकल्पाला सुरवात झाली असून , मतदारानी दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. यापुढेही केंद्राचाच राज्याला पाठिंबा मिळत राहील. महाराष्ट्र आता थांबणार नाही असा हा अर्थसंकल्प आहे. लाडक्या बहिणी मिळाल्या त्यामुळे धन्य झालो. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येतेय. राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल याची खात्री आहे. महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केलं जाणार. त्याचप्रमाणे परकीय गुंतवणुकीतून १६ लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये दावोसमध्ये एकूण ५६ कंपन्यांसोबत करार केले. गुंतवणूक येत असल्यामुळे राज्यात रोजगार वाढतोय. गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास येणार. वीज खरेदीत १ लाख ५ हजार कोटींची बचत होणार आहे. नवी मुंबई नाविन्यता इन्होवेशन सिटी होणार. नागपूरात अर्बन हट केंद्राची स्थापना होणार असल्याचे अजित पवार अर्थसंकल्पात सांगत आहेत.
वाढवण बंदर जेएनपीटीच्या तिप्पट असणार. मुंबईचे तिसरे विमानतळ वाढवण बंदराजवळ असेल. MMR क्षेत्र ग्रोथ सेंटर म्हणून विकसित केलं जाणार. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादचं काम प्रगतीपथावर आहे. बीकेसी, वडाळा आणि कुर्ला वरळीत आंतरराष्ट्रीय ददर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार. गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसरमध्येही व्यापाराची केंद्र बनवणार. मिसिंग लिंक ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मुंबईतील वर्सोवा ते मढ खाडीपूल बांधण्यात येणार.
- सिंचन योजना (पाणी प्रकल्पाबाबत) महत्वाच्या घोषणा
१. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून ५४.७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार
२. मराठवाड्यातील सुमारे २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार
३. सांगली जिल्ह्यातील २०० मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 1 हजार 594 कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता
४. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर २०२४ अखेर १२ हजार ३३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण, प्रकल्प जून, २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
- कृषी संजीवनी शेती प्रकल्प
१. २१०० कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार
२. राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट २.० ” हा २१०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार
३. शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे, यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविणार
४. बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतूकीसाठी “बळीराजा शेत व पाणंद रस्ते” ही नवी योजना सुरू करणार
- विमानतळ प्रकल्प
१. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार
२. नवी मुंबईतील उलवे येथे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ८५ टक्के काम पूर्ण एप्रिल, २०२५ मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करणार
३. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण
४. शिर्डी विमानतळाच्या १ हजार ३६७ कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता- नाईट लँडिगची सुविधाही लवकरच सुरु करणार
५. अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण ३१ मार्च, २०२५ पासून प्रवासी सेवा सुरु करणार
६. रत्नागिरी विमानतळाची १४७ कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर
७. गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु
८. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार
- स्मारक प्रकल्प
१. पानिपतमध्येही स्मारक उभारण्यात येणार.
२. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामी गोदावरी विकास आराखडा तर रामकालपथ तयार केलं जाणार.
३. संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. तुळजापूरमध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या स्मारकाचं काम सुरु.
- लाडकी बहीण योजना
१. २४ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचं लक्ष्य.
२. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत ३३ हजार २३२ कोटी खर्च झाले.
३. लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद.
४. २ कोटी ५३ लाख लाडक्या बहिणींना जुलै २०२४ पासून लाभ देतोय, आतापर्यंत ३३,२३२ कोटींचा खर्च
हे ही वाचा :
एकापाठोपाठ एक विरोधकांचे व्हिडीओ बाहेर, धसांनंतर आता Sandeep Kshirsagarअडचणीत नेमकं यामागे कोण?
Follow Us