spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?

२१०० कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर झाला. सगळ्याच घटकांना या अर्थसंकल्पाकडून भरपूर अपेक्षा होत्या. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी काय तरतुदी केल्या आहेत त्यावर सर्व जनतेचे लक्ष होते. २०२५-२६ वर्षांसाठीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी संजीवनी शेती प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळाले हे पाहणं महत्वाचे आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा- २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येणार-त्यासाठी ३५१ कोटी ४२ लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर – पहिल्या टप्प्यात ५० हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा – दोन वर्षात ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.

२१०० कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी “महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट 2.0” हा २१०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार तर शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे, यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतूकीसाठी “बळीराजा शेत व पाणंद रस्ते” ही नवी योजना सुरू करणार असल्याची घोषणा झाली.

हे ही वाचा : 

एकापाठोपाठ एक विरोधकांचे व्हिडीओ बाहेर, धसांनंतर आता Sandeep Kshirsagarअडचणीत नेमकं यामागे कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss