महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी दिवाळीच्या (DIWALI) शुभमुहूर्तावर गुरुवारी सहकुटुंब तिरुपतीला जाऊन तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासह त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,(DR. SHRIKANT SHINDE) पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे, सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश आणि इतर सहकारी तसेच तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष भुमना करुणाकर रेड्डी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री बालाजी चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेला सुखी-समाधानी ठेवण्याचे मागणे मागितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तिरुपती येथे सहपरिवार आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम तिरूचनुर येथे जाऊन श्री पद्मावती अम्मा मंदिराला भेट दिली. त्यांनतर त्यांनी कुटुंबासमवेत दर्शन घेतले. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.
हे ही वाचा :
उच्च न्यायालयाने फेटाळली शीझानची याचिका,शीझानवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा; प्रकरण नेमकं काय?