महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका २० नोव्हेंबरला पार पडल्या तर २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२ दिवस उलटून अखेर आज ५ डिसेंबरला अवघ्या जनतेने सुवर्ण क्षणाचा अनुभव घेतला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांना उधाण आले असतानाच काल ४ डिसेंबरला भाजपच्या बैठकीत झालेल्या निर्णयात विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आणि अखेर सर्वांची प्रतीक्षा संपली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सलग सहाव्यांदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
आज ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. याशिवाय, अनेक राजकीय आणि कलाकार मंडळी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.