Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभआ निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबलदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंतयारी होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री मात्र कोण होणार हे अजून जाहीर झाले नाही. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा हा उद्या (सोमवार, २५ नोव्हेंबर) होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे. अश्यातच आता महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
महायुतीच्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता मुख्यमंत्रिपडाच्या चेहऱ्याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मोठी माहिती मिळाली आहे. एकीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली असली तरी भाजपच्या नेत्यांनी मात्र मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नागाव पुढे केल्याचे स्पष्ट होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा पॅटर्न कायम राहणार आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे हि प्रमुख पदं कायम राहणार आहेत. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्रीपद हे भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जरी भाजपचा असला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेत योग्य सन्मान दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
२५ नोव्हेंबरला शपथ घेणार नवे मुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभूतपूर्व विजयानंतर राज्यभरात महायुतीचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांपैकी भाजपला ऐतिहासिक असे तापर्यंतचे सर्वात मोठे यश प्राप्त झाले आहे. दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकीत राज्यात दमदार कामगीरी करूनसुद्धा महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला ५० चा एकदा गाठणेही कठीण झाल्याचं पाहायला मिळालं. महायुतीने मात्र २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळवला. आता महायुतीच्या विजायानंतर पुढील मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या ग शपथविधी सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुले एक दिवस आधीच सरकार स्थापन केले जाणार असल्याचं समजत आहे.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”