Friday, December 1, 2023

Latest Posts

MAHARASHTRA ELECTIONS: ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी ग्रामपंचायतीत काँग्रेस पॅनल विजयी झाला आहे. काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला आहे. महेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. कोल्हापुरात बारडवाडीत लोकनियुक्त सरपंच वसंत पांडुरंग बारड विजयी झाले आहेत.

राज्यभरात सध्या ग्रामपंचायत तिच्या निवडणुकीचे वातावरण दिसून येत आहे. २३६९ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले आहे तर काही ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाले असून २९५० सदस्य पदाच्या परीक्षेत सरपंच पदाच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी मतदान झाले. राज्यभरातील सुमारे २३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २९५० सदस्य पदाच्या सरपंच पदाच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाला आहे.

कोल्हापुरात राधानगरी चांदेकरवाडी येथे लोकनियुक्त सरपंच सीमा खोत विजयी झाल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचतीच्या निवडणुकीत भाजप समर्थक आघाडीचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. करमाळा तालुक्यातील गोंडारे आणि रामवाडी या दोन ठिकाणी संजय मामा शिंद गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील न्यू करंजेत लोक नियुक्त अर्पणच सद्दाम शिराज तांबोळी यांनी विजय मिळवला आहे. तर कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील फराळे लोक नियुक्त सरपंचपद सतेज पाटील गटाकडे सीमा डवर विजयी झाले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी ग्रामपंचायतीत काँग्रेस पॅनल विजयी झाला आहे. काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला आहे. महेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. कोल्हापुरात बारडवाडीत लोकनियुक्त सरपंच वसंत पांडुरंग बारड विजयी झाले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या प्रिया प्रकाश कामडी लाल ठाणे ग्रामपंचायतीवर सरपंच पदासाठी विजयी झाल्या आहेत. कोल्हापुरातील राधानगरी पालकरवाडीत लोकनियुक्त सरपंच महेश नामदेवराव भोईटे विजयी झाले आहेत. पालघरमधील उनभाट पंचायतमध्ये सरपंच पदासाठी ठाकरे गटाच्या संगीता पाठारे विजयी झाल्या आहेत तर बुलढाणा तालुक्यातील घाटनंद्रा ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून गणेश भुसारी विजयी झाले आहेत.

हे ही वाचा : 

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या साखरपुड्यातील पांरपारिक लूक   

 ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मालिका घेणार २५ वर्षांची लीप,गौरी-जयदीपचा होणार पुनर्जन्म

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss