राज्यभरात सध्या ग्रामपंचायत तिच्या निवडणुकीचे वातावरण दिसून येत आहे. निवडणुकांचा प्रचार आता थांबला आहे. आज २३६९ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडणार आहे. काही ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाले असून रविवारी २९५० सदस्य पदाच्या परीक्षेत सरपंच पदाच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. राज्यभरातील सुमारे २३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २९५० सदस्य पदाच्या सरपंच पदाच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक आज होणार आहे.
सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी अर्थात सहा नोव्हेंबरला होणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ ठरवण्यात आली आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात ७ नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात अजित पवार यांचे कुटुंब ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा आशा पवार यांनी व्यक्त केली. माझ्या डोळ्यातदेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावं, असं देखील त्या म्हणाल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पंचायतीत मतदान असूनही तब्येतीच्या कारणास्तव खासदार अमोल कोल्हे मतदान करणार नसल्याची माहिती मिळाली आहे. याव्यतिरिक्त जळगाव या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या गावात मतदान करणार आहेत. तर पंढरपूर येथील सांगोल्यात महुद गावात शहाजी बापू पाटील मतदान करतील.
हे ही वाचा :
कायद्य्याच्या पलीकडचं मागणाऱ्या मनोज जरांगे हाती सरकारी GR; भाषा बदलली दिशा बदलणार?
तुम्हाला मिळणाऱ्या Diwali Bonus ची सुरुवात नेमकी कशी झाली? Diwali 2023