महाराष्ट्र केसरी २०२३: ६६ वी स्पर्धा पुण्यात पार पडणार आहे. पुण्याजवळील फुलगाव येथे या जंगी कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. तीन दिवस या थराराराला बाकी असून ७ नोव्हेंबर २०२३ ते १० नोव्हेंबर २०२३ यामध्ये या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आहे. कुस्तीसाठी पोरांनी वर्षेभर घेतलेली मेहनत पाहता आयोजकांनी बक्षिसांची खैरात केलेली पाहायला मिळत आहे. ट्रॅक्टर, महिंद्रा थारसह इतर बक्षीस विजेत्यांना यावर्षी मिळणार आहेत. फुलगावमध्ये महाराष्ट्र केसरीचा फड रंगलेला यंदा पाहायला मिळणार आहे. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ यामध्ये सहभागी होणार आहेत.गादी आणि माती गटांत स्पर्धा होणार असून या थरारामध्ये ८४० मल्ल सहभागी होणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते या महाराष्ट्र केसरीचं उदघाटन होणार आहे.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. मल्लांसाठी एक मोठी गोष्ट म्हणजे कुस्तीगीर संघटनेच्या वादात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असून त्यांना या दोन्ही ठिकाणी सहभागी होता येणार आहे.
धाराशिवमध्ये होणार दुसरी ‘महाराष्ट्र केसरी’
धाराशिवमध्ये दुसरी महाराष्ट्र केसरी पार पडणार आहे. १६ ते २० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना स्कॉर्पिओ एन आणि १ लाख रुपये, २० बुलेट अशी बक्षिसे असणार आहेत. मागील वर्षीसुद्धा मोठा संभ्रम झालेला पाहायला मिळालेला त्यामुळे तेव्हा मल्लांवर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत पुण्यातील कोथरूड येथे शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता.
हे ही वाचा :
‘माझ्या हृदयाच्या खूप जवळ असणारा सिनेमा’,पोस्ट शेअर करत नव्या भूमिकेत दिसणार रिंकू
प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे टॉप 4 Smart Air Purifier…