Thursday, March 28, 2024

Latest Posts

Maharashtra Board SSC Result 2023, अखेर आज जाहीर होणार दहावीचा निकाल, कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट?

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल काही लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यासोबत त्यांच्या पालकांना देखील लागली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल काही लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यासोबत त्यांच्या पालकांना देखील लागली होती.अखेर आज दिनांक २ जुन रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या ९ विभागीय मंडळातील २०,०१० शाळांमधील १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ८,४४,११६ मुले आणि ७,३३,०६७ मुलींचा समावेश हाेता.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट (Official website to check 10th result)

http://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

http://ssc.mahresults.org.in

असा करा निकाल चेक –

  1. इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
  2. त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा
  3. त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करा
  4. त्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाका
  5. निकाल लगेच स्क्रिनवर दिसेल
  6. मार्कशीट चेक केल्यानंतर प्रिंट घ्या.

Latest Posts

Don't Miss