राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेचा प्रवास नवीन वर्षापासून सुखकर होणार आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायक व्हावा, यासाठी लवकरच एसीची बस (AC BUS) दाखल करण्यात येणार आहे. यासाठी केंद्राने पीएमई बस (PME BUS) सेवा प्रकल्प अंतर्गत तब्बल १३०० वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत. दोन महिन्यात या बस महापालिका परिवहन समितीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामध्ये नागपूर (NAGPUR), कोल्हापूर (KOLHAPUR), ठाणे (THANE), नाशिक (NASHIK), छत्रपती संभाजीनगर (CHHATRAPATI SAMBHAJINAGR) यासह पंधरा शहरांचा समावेश असणार आहे. यासाठी केंद्राकडून तब्बल ५०० कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.
राज्यात बहुतांशी महापालिका क्षेत्र सुरू असलेली परिवहन सेवा तोट्यात आहे. काही ठिकाणी बसची संख्या प्रचंड कमी आहे, ज्या आहेत त्यांची स्थिती खराब आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात या पार्श्वभूमीवर जनतेचा प्रवास सुखकर आणि गतिमान व्हावा तसेच प्रदूषण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या विशेष समितीच्या वतीने पीएम इ बस सेवा प्रकल्प ही योजना राबविण्यात आली. त्याअंतर्गत देशभरातील शहरात इ बस सुरु व्हावी, यासाठी प्रस्ताव देण्यात आले होते.
हे ही वाचा :
मराठा आरक्षणाबाबत किरण मानेंची पोस्ट, “मराठा बांधवांनो, आरक्षणाला समर्थन देताना परजातीला..
एसीपासून ते फ्रिज आणि कारपर्यंत भारतीयांच अनेक गोष्टींवर प्रचंड खर्च