नाशिक (Nashik) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मोठी कारवाई केली होती. अमित गायकवाड आणि गणेश वाघ या दोन अभियंत्यांवर लाच प्रकरणात कारवाई केली. या दोघांनी तब्बल एक कोटी रुपयांची लाच ठेकेदाराकडून घेतली. अहमदनगर (Ahmednagar) एमआयडीसीतील लोखंडी पाइपलाइन बदलण्यासाठी प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली गेली. या प्रकरणात अमित गायकवाड याला रंगेहात पकडण्यात आले. परंतु गणेश वाघ फरार आहे. पोलिसांनी त्याच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे येथील घरावर छापे टाकले आहे. त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहे. वाघ आणि गायकवाड यांच्या मूळ गावातील घरांवर तपासणी पथकाने छापा टाकला.
अमित गायकवाड याचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे घर आहे. त्याच्या गावातील घरावर पथक पोहचले. मात्र पोलिसांना काहीही माहिती मिळाली नाही. गणेश वाघ याच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र त्या ठिकाणी काही मिळाले नाही. यामुळे या लाचखोरांनी केलेली रक्कम कुठे ठेवली आहे? हे शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. गणेश वाघ याच्या पुणे (Pune) येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पोहचले. त्यानंतर धुळे (Dhule) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील घरावर पथक दाखल झाले. ही तिन्ही घरे सील केली आहेत. अजूनपर्यंत तपासणी पथकाला काहीच माहिती मिळाली नाही.गणेश वाघ याला अमित गायकवाड लाच घेताना रंगेहात पकडला गेल्याचे समजले. त्यानंतर तो फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहे. परंतु अजूनही त्यांना यश आले नाही. त्याचे लोकेशन (Location) तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्याचा मोबाइल बंद आहे. गणेश वाघ आणि अमित गायकवाड या दोघांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार आली होती. कारवाई करण्यापूर्वी पंधरा दिवस त्यांचे फोन कॉल रेकॉर्ड करण्यात आले.
हे ही वाचा :
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या साखरपुड्यातील पांरपारिक लूक
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मालिका घेणार २५ वर्षांची लीप,गौरी-जयदीपचा होणार पुनर्जन्म