दिवाळीच्या काळात एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने सोमवार दिनांक सहा नोव्हेंबर पासून संपाची हाक दिली आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळाला देखील याचा सामना करावा लागणार आहे. जेमतेम दोन वर्षांपूर्वी अनेक मागण्यांसाठी एसटी कडून संप पुकारण्यात आला होता. आता एसटी संपामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा सहभाग घेण्याचे ठरवले. या संपानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन केली. एसटी महामंडळाच्या ताब्यात ८५ टक्के बस आहेत पण त्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्याशिवाय सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. या संपात ६८ हजार एसटी कर्मचारी सामील होणार असल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.
मागील काही महिन्यांपासून एसटीकडे अनेक नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होतात दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात आणि आता दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी जास्त प्रमाणात बसेसची सोय केली जाते. आता गणेश उत्सवानंतर दिवाळीच्या सणामुळे एसटी महामंडळाच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरीही सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाकडून जर संप करण्यात आला, तर त्याचा फटका एसटी महामंडळाच्या उत्पन्नात होऊ शकतो. सर्वांना सोयीचे वाटणारी एसटी महामंडळाच्या बसची सेवा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू आहे. डबल डेकर बंद झाल्यानंतर प्रवाशांकडून एसटीला प्राधान्य दिले जात आहे. हीच एसटी काही वर्षांपूर्वी तोट्यात होती. त्यात मागे सातवा वेतन आयोगाच्या कारणावरून अनेक कर्मचारी संपावर गेले होते. संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाला ९ हजार कोटी रुपयांचा तोटा झाल्याची बाब समोर आली आहे. सध्या दैनंदिन आणि मासिक तोट्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही ऐन सणासुदीत जर संप पुकारण्यात आला तर एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा :
कायद्य्याच्या पलीकडचं मागणाऱ्या मनोज जरांगे हाती सरकारी GR; भाषा बदलली दिशा बदलणार?
तुम्हाला मिळणाऱ्या Diwali Bonus ची सुरुवात नेमकी कशी झाली? Diwali 2023