शेतकऱ्यांनी दसऱ्याला झेंडुच्या फुलाला कमी भाव मिळाल्याने झेंडूची फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. पण दिवाळीला परिस्थिती उलटी झाली असून झेंडुला ८० ते शंभर रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात व दसऱ्याला झेंडुच्या फुलांची बाजारांत आवक खूप मोठी होती.अर्धापूर शहरातच ५० ते साठ ठिकाणी विक्री केली जात होती.भाव मात्र दहा रुपये प्रति किलो चांगल्या प्रतीच्या फुलांना मिळत होता.शेतकऱ्यांचा फुलं तोडण्याचा व वाहतुकीची खर्च निघाला नाही. काही शेतकऱ्यांनी फुलांचे ढिग रस्तावर सोडून दिले. तसेच, शेतातील झेंडुचे झाडें उपटून टाकली होती. दीपावलीच्या निमित्ताने लक्ष्मीपुजन, घराची सजावट करण्यासाठी फुलांची खुप मोठी मागणी असते.
दीवाळीला बाजारात फुलांची आवक खूप मोठी घटली.याचा परिणाम फुलांच्या दरावर झाला. शहरातील मुख्य बाजारपेठेत, बसस्थानक परिसरात काही मोजक्याच ठिकाणी पुलांची विक्री केली जात होती. साधारण प्रतीचे फुला ८० ते शंभर रुपये प्रति किलो भावाने विक्री केली जात होती. तसेच फुलांचा हारांच्या किंमतीत वाढ झाली होती. या वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा फुलविक्रेत्यांना जास्त झाला आहे.
हे ही वाचा :
प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते ‘हीच माझी दिवाळी’
MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी