Maharashtra Weather Update : हवामान खात्याने राज्यात थंडीचा जोर वाढण्याबरोबरच अवकाळी पावसाचा इशारा दर्शवला आहे. उत्तर भारतातून दक्षिणकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. राज्याचे तापमान घसरल्यामुळे राज्यात गारठा हळूहळू वाढत आहे. सोमवारी मुंबईत १३ अंश किमान तापमानाची नोंद झाली असून विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पारा १२ अंशावर गेला आहे. पुढच्या २ ते ३ दिवसात आणखी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात थंडीचा प्रभाव वाढत असल्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात किमान तापमान ३ ते ५ अंशांची घट झाली असुन राज्यात गारठा वाढत आहे.
सोमवारी पुण्यात १३.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली तर नाशिकमध्ये १४.७, कोल्हापूरमध्ये १६.१, सोलापूर १७.२ आणि साताऱ्यात १२.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात पार काही भागात १२ अंशापर्यंत आली आला आहे. अकोल्यात १५.९ अंश तापमानाची नोंद झाली. अमरावतीत ११.९, भंडाऱ्यात १३.०, बुलढाणा १७.५, ब्रम्हपुरी १२.०,गडचिरोली १२.०, गोंदिया ११.४, नागपूर ११.२, वर्धा ११.९, वाशीम १६.२, आणि यवतमाळ १५.४, अंश तापमाची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १-३ अंशांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात राज्यातील तापमान कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं असून ३-५ अंशांनी किमान तापमानात घसरण होणार आहे.उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह बर्षवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरावर आहे. राज्यातील मराठवाडा, मध्य उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?