महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. आज मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे. देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी डोंबिवलीतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईसाठी रवाना झाले आहेत. डोंबिवलीतील प्रत्येक प्रभागातून एक बस अशा दोनशे बस रवाना झाल्याची माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे. लाडक्या बहिणीसुद्धा शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाकडे रवाना झाल्या आहेत.