Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Budget 2025 : राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (१०मार्च) अर्थसंकल्प सादर केले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात फडणवीस सरकारने देखील मोठ्या घोषणा केल्या. मात्र संपूर्ण अर्थसंकल्पात सगळ्यांचे लक्ष हे लाडकी बहीण योजनेकडे लागले होते. त्याबाबतही अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजने महत्वाची घोषणा
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आजचा अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
2100 रुपये मिळणार की नाही?
2100 रुपये मान्य केलेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पातून देणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावर्षी जी तरतूद करण्यात आली, तेवढ्याच रकमेची तरतूद 2025-26 वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींना 2100 रुपये मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
या योजनेबाबत अदिती तटकरे काय म्हणाल्या होत्या?
लाडक्या बहिणींना सरकारने एक मोठा धक्का दिला आहे. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे वारंवार या योजने बद्दल अपडेट देत असतात. नुकताच त्यांनी महिलांना २१०० रुपये मिळणार कि नाही यावर सांगितले की, जाहीरनामा हा ५ वर्षांचा असतो. अद्याप मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी २१००रुपये देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे.
हे ही वाचा :
Follow Us